esakal | Taliban : अफगाणिस्तानसाठी विमानसेवा सुरु होणार? तालिबान सरकारचं DGCAला पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Air-India

अफगाणिस्तानसाठी विमानसेवा सुरु होणार? तालिबान सरकारचं DGCAला पत्र

sakal_logo
By
अमित उजागरे

काबूल : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं भारताला थांबवलेली विमानसेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे. यासाठी तालिबाननं भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) पत्र लिहिलं आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचं पत्र DGCAला मिळालं असून नागरी हवाई मंत्रालयाकडून (MoCA) याची छाननी केली जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर तिथं मोठी अनागोंदी माजली होती. त्यामुळे भारतानं १५ ऑगस्ट २०२१ पासून अफगाणिस्तासाठी विमानसेवा बंद केली होती.

loading image
go to top