दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही – सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

नवी दिल्ली - पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. या पार्श्वभूमिवर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली. तरेच दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही असे पाकिस्तानला त्यांनी खडसावले आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय दिलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘भारतीय जग: मोदी सरकारचे परराष्ट्र धोऱण’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आम्हाला दहशतवादावर चर्चा नको आहे, तर कारवाई हवी आहे असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये वारंवार अडथळा आणणाऱ्या आयएसआय आणि लष्करावर पाकिस्तानने नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

‘पाकिस्तानी लष्कर जैशे महंमदच्या वतीने आमच्यावर हल्ला का करत आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पाक जैशेला आपल्या जमिनीवर फक्त आश्रय देत नाही तर त्यांना पैसेही पुरवतो. असे असताना जेव्हा दहशतवादाने पीडित देश याचे उत्तर देतो, तेव्हा तुम्ही दहशतवाद्यांच्या वतीने त्या देशावरच हल्ला करता, अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.

जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मग त्यांनी मसूद अजहरला आमच्याकडे सोपवावे, अशी मागणी यावेळी सुषमा स्वराज यांनी केली. 

जर पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर आश्रय मिळालेल्या दहशतवादी संघनटनांवर कारवाई केली तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारु शकतात असेही त्या म्हणाल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talks and terror cannot go together said Sushma Swaraj