
सीमावादावर चीनशी उद्या चर्चा
नवी दिल्ली : भारत आणि चीन(China) यांच्यात बुधवारी (ता. १२) लष्करी पातळीवरील वाटाघाटींची १४ वी फेरी होणार आहे. लडाख (Ladakh)सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून सीमावादावर (border dispute)घडलेल्या शाब्दिक चकमकींनंतर यातून ठोस तोडगा निघेल अशी अपेक्षा लष्कराच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण
ताबारेषेवर चुशूल मोल्डो क्षेत्रात चीनी हद्दीमध्ये दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी बुधवारी चर्चा करतील. पूर्व लडाखमधील तणाव बिंदूंवरून विशेषतः गोग्रा आणि हॉटस्प्रिंग या भागांतून चीनने सैन्य मागे घ्यावे यावर भारत ठाम असून बुधवारच्या वाटाघाटींमध्ये हा मुद्दा भारताकडून ठामपणे मांडला जाईल. यासोबतच, देप्सांग आणि देम्चोक यासह अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या संपूर्ण सीमेवर वाढलेला कमी करण्यासाठीही सांगितले जाईल. सैन्य मागे घेणे ही चीनची जबाबदारी असल्याचे भारताकडून वारंवार सांगितले जात असून सीमेवरील शांतता आणि सलोख्यासाठी चीनकडून शांतता करारांचे पालन होणे आवश्यक असल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: ठेवीची रक्कम परत न केल्याने पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल
चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमव करून तणाव वाढविल्याने भारतानेही ५० हजारांहून जास्त सैन्य ताबारेषेवर सज्ज ठेवले आहे. सैन्यमाघारीबाबत चीनच्या आडमुठेपणामुळे मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या १३ व्या फेरीच्या चर्चेतून काहीही ठोस निष्पन्न निघू शकले नव्हते.
वर्षारंभीच डिवचले
नव्या वर्षाच्या प्रारंभी गलवान खोऱ्यात चीनी सैनिक झेंडा फडकावत असल्याचा व्हिडिओ जारी करून त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेशातील भागांची चिनी भाषेतील नावे जाहीर करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. तर भारतानेही प्रत्युत्तर देताना, अरुणाचल हा भारताचा भाग असून असे नावे बदलण्याने काहीही होणार नाही असे सुनावले होते.
Web Title: Talks With China On Border Dispute Tomorrow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..