तमिळ अभिनेत्रीस वेश्याव्यसायाप्रकरणी अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

संगीता व तिचा सहकारी सतीश हे दोघं तरूणींना चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्यांना जाळ्यात अडकवत व वेश्याव्यसाय करण्यास भाग पाडत. सतीशला ही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

चेन्नई : तमिळ अभिनेत्री संगीता बालनला चेन्नईत वेश्याव्यसाय चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विविध राज्यातील महिलांची संगीताच्या ताब्यातून सुटका करण्यात आली असून त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती चेन्नई पोलिसांनी दिली. 

संगीता व तिचा सहकारी सतीश हे दोघं तरूणींना चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्यांना जाळ्यात अडकवत व वेश्याव्यसाय करण्यास भाग पाडत. सतीशला ही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

1996 मध्ये संगीताने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याचबरोबर वानी रानी, चेल्लामय, अवल, वल्ली यांसारख्या टिव्ही मालिकांमध्येही तिच्या भूमिका लोकप्रिय होत्या. 

Web Title: tamil actress arrested for running prostitute racket