Thalapathy Vijay Support AIADMK : तामिळनाडूत महाराष्ट्रासारखी फूट! आण्णा द्रमुकचे दोन भाग; थलपती विजयला थेट पाठिंबा

Tamil Nadu assembly politics : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून आण्णा द्रमुकमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक आमदारांच्या गटाने थलपती विजय यांच्या टीव्हीकेला थेट पाठिंबा दिला आहे.
Thalapathy Vijay Support AIADMK tamilnadu politics

Thalapathy Vijay Support AIADMK tamilnadu politics

esakal

Updated on

AIADMK supprt Thalpathy Vijay : तामिळनाडूतील आण्णा द्रमुक (AIADMK) पक्षात आता दोन स्पष्ट गट पडल्याचे चित्र समोर आले आहे. आमदार सी. व्ही. शन्मुगम यांच्या नेतृत्वाखालील गटाने बहुमताचा दावा करत थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (TVK) सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच DMKच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याच्या प्रस्तावाला पक्षातील बहुसंख्य सदस्यांनी विरोध केल्याचे शन्मुगम यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com