esakal | स्वस्त इंधन अन्‌ पेट्रोलचा वादा; द्रमुकच्या जाहीरनाम्यात आकर्षक घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

चेन्नई - तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुकचा जाहीरनामा शनिवारी प्रकाशित करताना पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन व अन्य नेते.

इंधन व गॅस दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी द्रमुकने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती क्रमशः पाच व चार रुपये लिटर कमी करण्याची आणि गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे.

स्वस्त इंधन अन्‌ पेट्रोलचा वादा; द्रमुकच्या जाहीरनाम्यात आकर्षक घोषणा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

चेन्नई - इंधन व गॅस दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी द्रमुकने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती क्रमशः पाच व चार रुपये लिटर कमी करण्याची आणि गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. 

द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी अण्णा अरिवलयम या पक्षाच्या मुख्यालयात जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. याआधी त्यांनी मरिना बीचवर जाऊन दिवंगत नेते सी. एन. अण्णादुराई आणि एम. करुणानिधी यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. इंधन व गॅस दरात कपात करण्याबरोबरच ५०० घोषणा केल्या आहेत. यामध्ये शैक्षणिक कर्जाची माफी, आविन दुधाचा दर तीन रुपयांनी कमी करणे, शिधापत्रिकाधारकांना चार हजार रुपये मदतनिधी देणे, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप, ‘नीट’ परीक्षा रद्द करणे या काही ठळक घोषणा आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पत्रकार व पोलिसांसाठी...

 • प्रसार व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी पत्रकार कल्याण आयोग नेमणार
 • पत्रकारांचे निवृत्तिवेतन आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनात वाढ

मंदिरांना निधी
द्रमुक हा हिंदूविरोधी पक्ष आहे, ही प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नही या जाहीरनाम्यात केला आहे. राज्यातील हिंदू मंदिरांची जीर्णोद्धार करण्यात येईल आणि कुंभभिषेकासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी, तसेच द्रमुक सत्तेवर आल्यावर मशिदी आणि चर्चच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपये देण्यात आश्‍वासन दिले.

लसीकरण सुरु तरीही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली; आरोग्यमंत्री म्हणाले,बेजबाबदारपणा कारणीभूत

जाहीरनाम्यातील अन्य आश्‍वासने...

 • सरकारी नोकऱ्यांमधील विविध पदे भरणार
 • नव्या पदवीधारकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य 
 • स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी बेरोजगार पदवीधारकांना २० लाख रुपयांचे कर्ज 
 • सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचे आरक्षण ३० टक्क्यांवरून ४० टक्के करणार
 • महिलांसाठी सरकारी बसमधून मोफत प्रवास
 • नोकरदार महिलांसाठी प्रसूती रजेची मुदत २४ महिने
 • मुलांच्या पोषणासाठी माध्यान्ह आहारात दुधाचा समावेश
 • माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या सेवा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना निश्‍चित वेतनश्रेणी 

West Bengal Assembly Election: ममतांवर हल्ला करणाऱ्यांविषयी सस्पेन्स वाढला

तमीळ भाषेसाठी...

 • राज्य व केंद्रीय शाळांमध्ये आठवीपर्यंत तमीळ भाषा विषय अनिवार्य
 • तिरुकुरल या प्राचीन वाङ्मयाला जागतिक वाङ्मयाचा दर्जा देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा

शेतकऱ्यांसाठी...

 • शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार
 • सर्व तेलबिया आणि डाळींना किमान हमी भाव

Edited By - Prashant Patil

loading image