'पंतप्रधान मोदींची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करावी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात तमिलीसाई यांच्यासह त्यांचे पती डॉ. पी. सुंदराजन यांनीही मोदींना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस केली आहे. पी. सुंदराजन हे खासगी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वांत मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ केल्याने त्यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी, अशी मागणी तमिळनाडूच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तमिलीसाई सुंदराजन यांनी केली आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात तमिलीसाई यांच्यासह त्यांचे पती डॉ. पी. सुंदराजन यांनीही मोदींना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस केली आहे. पी. सुंदराजन हे खासगी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 

या निवेदनात म्हटले आहे, की पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य योजनेचा फायदा मिळण्यासाठी आयुष्मान भारत ही योजना सुरु केली आहे. त्यांच्या याच कामाचे कौतुक म्हणून 2019 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात यावी. मोदींची या योजनेतून दूरदृष्टी दिसून येते. त्यांच्या या योजनेचा कोट्यवधी नागरिकांना फायदा होणार आहे. विशेष करून गरिब कुटुंबातील नागरिकांना आरोग्य सेवेचा फायदा घेता येणार आहे. जगात अशी योजना कोठेच अवलंबिलेली नाही.

Web Title: Tamil Nadu BJP chief nominates PM Narendra Modi for Nobel Peace Prize