

K Annamalai resignation, Tamil Nadu BJP
Esakal
तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष के अन्नामलाई यांनी मंगळवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे पाच पानी राजीनामा सोपवला. यानंतर अन्नामलाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि ते चेन्नईला रवाना झाले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकीत अन्नामलाई यांनी सौहार्दपूर्ण वातावरणात पक्षातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिलीय.