तामिळनाडूतही ठाकरे पॅटर्न! मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मंत्रीमंडळात समावेश; दिलं 'हे' खातं

तामिळनाडूतही ठाकरे पॅटर्न! मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मंत्रीमंडळात समावेश; दिलं 'हे' खातं

चेन्नई - तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे ज्येष्ठ पुत्र उधयानिधी स्टॅलिन यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या साध्या समारंभात उधयानिधी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) चे आमदार आणि पक्षाच्या युवा आघाडीचेसचिव उदयनिधी स्टॅलिन यांना तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी मंत्रीपदाची शपथ दिली.

पक्षाचा ट्रेडमार्क असलेला पांढरा शर्ट घालून उधयानिधी यांनी आपले वडील आणि पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्या शैलीत तमिळ भाषेत शपथ घेतली. त्यांच्या शर्टवर द्रमुकच्या युवा आघाडीचा लोगो छापलेला होता. शपथविधी सोहळा १० मिनिटांत संपला. त्यानंतर राज्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उदयनिधी यांचे अभिनंदन केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com