Tamil Nadu CM एम. के. स्टॅलिन यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

M.K. Stallin - Rahul Gandhi

Tamil Nadu CM एम. के. स्टॅलिन यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन आज कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या हस्ते चेन्नई येथे करण्यात आलं. यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, RJD चे नेते तेजस्वी यादव आणि जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला आदी उपस्थित होते. (M. K. Stalin's Autobiography Publication In chennai)

तसेच एम. के. स्टॅलिन हे द्रविडियन असणाऱ्या DMK या पक्षाचे पक्षप्रमुख असून 'उंगलील ओरूवन' असं या आत्मचरित्राचं नाव आहे. 'तुमच्यातलाच एक' असा या तमिळ शब्दाचा अर्थ होतो. या चरित्राच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन झालं असून यावेळी राजकीय व्यक्तींव्यतिरिक्त नामवंत कलाकार, कवी, अभिनेते सत्यराज तसेच विविध क्षेत्रांतील नामवंतांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

हेही वाचा: PM मोदींच्या आईच्या वजनाएवढं सोनं काशी विश्वनाथ मंदिराला दान

स्टॅलिन यांचा जन्म १९५३ मध्ये झाला. पहिल्या खंडात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील १९७६ पर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, शालेय, महाविद्यालयीन जीवन, राजकारणातील प्रवेश, विवाह तसेच आणीबाणीचा खडतर कालखंड याविषयी मी लिहिलं आहे. या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या पंचविशीपर्यंतच्या आयुष्याला उजाळा देताना म्हटलंय की, मला आपले नेते आणि त्यांचे धोरणं याविषयी अभिमान वाटतो. त्याचवोळी पक्षाने प्रगती करण्यासाठी केलेला संघर्ष पाहून मी भावूक होतो असही त्यांनी या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

एम. के. स्टॅलिन हे DMK या पक्षाचे 28 ऑगस्ट २०१८ पासून पक्षप्रमुख असून त्यांच्या पक्ष हा भाजपा आणि कॉंग्रेसनंतर लोकसभेतील तिसरा सर्वांत मोठा पक्ष आहे. तसंच तामिळनाडूमधील सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष आहे. तसेच स्टॅलिन हे चेन्नईचे १९९६ ते २००२ दरम्यान ३७ वे महापौर होते. ते २०१९ मध्ये the indian Express च्या सर्वांत शक्तीशाली व्यक्तीमत्व या पुरस्काराचे मानकरी होते.

Web Title: Tamil Nadu Cm Mk Stalin Autobiography Publication

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top