

CM Vijay Launches Gold Ring Scheme
Esakal
Tamil Nadu CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी मदुराई येथून नवजात बाळांसाठी सोन्याची अंगठी देण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या नवजात बाळांना २२ कॅरेट सोन्याची एक ग्रॅमची अंगठी दिली जाणार आहे. मदुराईतल्या राजाजी सरकारी रुग्णालयात योजनेचा शुभारंभ करण्यात आला. विजय यांनी निवडणुकीआधी याबाबत आश्वासन दिलं होतं. दरम्यान, या योजनेला सुरुवात करताच भाजपकडून जोरदार टीका करण्यात आलीय.