Supreme Court stay on Tamil Nadu cow slaughter ban order
esakal
नवी दिल्ली : तामिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गोहत्या बंदीची अंमलबजावणी करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या (Madras High Court cow slaughter ban latest news) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणी तामिळनाडू सरकारच्या विशेष अनुमती याचिकेवर (एसएलपी) सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.