९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

Court Calls Case Rarest of Rare: पिता-पुत्राच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी शिक्षेची सुनावणी करताना कोर्टाने ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं म्हटलं आहे. तामिळनाडूतील ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलीय.
Court Calls Case Rarest of Rare

Nine Police Get Death Sentence in Custody Case

Esakal

Updated on

Tamilnadu News: तामिळनाडूत मदुराई सत्र न्यायालयानं एकाचवेळी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलीय. पिता-पुत्राच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी शिक्षेची सुनावणी करताना कोर्टाने ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं म्हटलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते आणि तेच पोलीस कायद्याच्या विरोधात वागतात अशी टिप्पणीही या प्रकरणी कोर्टाने केलीय. कोरोना काळात अनेक निर्बंध लादले होते. त्यावेळी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दुकान चालवणाऱ्या पिता पुत्राला अटक केली होती. पोलीस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. Tamil Nadu Custodial Death Verdict

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com