Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

Fireworks Factory explosion : बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अग्निशमन दल ढिगारा हटवण्याचे काम करत आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी शोक व्यक्त करत मंत्र्यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.
Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी
Updated on

तामिळनाडूमध्ये एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा बळी गेला असून, अन्य सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना विरुधुनगर जवळच्या कट्टानारपट्टी येथे घडली. प्राथमिक अहवालांनुसार, जिल्ह्यांतर्गत कट्टानारपट्टी गावात असलेल्या एका फटाका निर्मिती केंद्रात हा स्फोट झाला. आता ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com