राज्यपालांवर शेरेबाजी... नथुराम गोडसेचे समर्थक असल्याची टिपण्णी; अभिभाषण अर्धवट सोडून आरएन रवींचा सभात्याग

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोमवारी त्यांचे सभागृहातील अभिभाषण अपूर्ण ठेवत काही मिनिटांतच उरकल्याने राज्यपाल आणि सरकार यांच्यादरम्यान पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
rn ravi
rn raviesakal

चेन्नईः तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोमवारी त्यांचे सभागृहातील अभिभाषण अपूर्ण ठेवत काही मिनिटांतच उरकल्याने राज्यपाल आणि सरकार यांच्यादरम्यान पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तमिळनाडू विधानसभेच्या सभागृहाच्या कामकाजाला सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. मात्र, राज्यपाल आर. एन. रवी हे काही मिनिटांत भाषण करून सभागृहातून निघून गेले. याप्रकरणी राज्यपाल कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार रवी यांनी कामकाज आणि अभिभाषण सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणण्याची सूचना केली होती मात्र तिचे पालन करण्यात आले नसल्याने राज्यपालांनी त्यांचे अभिभाषण पूर्ण न वाचता काही मिनिटांतच सभात्याग केला.

त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी राज्यपालांवर ‘नथूराम गोडसेचे समर्थक’ अशी शेरेबाजी केल्याने राज्यपालांनी सभात्याग केला, असाही दावा करण्यात येत आहे.

rn ravi
Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामागची ही आहेत 5 कारणं; 'वंचित'ची एन्ट्री अन् मोदी-शाहांची गरज..

दरम्यान, ज्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण असते त्या दिवशी सभागृहाचे कामकाज अभिभाषणाने सुरू होते आणि कामकाज संपताना राष्ट्रगीत म्हटले जाते, असा दावा विधानसभा अध्यक्ष एम. अप्पावू यांनी केला आहे. तमिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने राज्यपाल अभिभाषण पूर्ण न करताच निघून गेले आहेत. मागील वर्षी देखील रवी यांनी त्यांच्या अभिभाषणातील काही मुद्दे गाळले होते आणि काही त्यांची वैयक्तिक मते भाषणात मांडली होती, असा आरोप करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com