esakal | पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे बनवली सोलर सायकल; बॅटरी संपली तरी 20 किमी धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे बनवली सोलर सायकल; बॅटरी संपली तरी 20 किमी धावणार

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे बनवली सोलर सायकल; बॅटरी संपली तरी 20 किमी धावणार

sakal_logo
By
विनायक होगाडे

मदुराई: देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. देशातील जवळपास सर्वच ठिकाणी पेट्रोलचे भाव शंभरीपार गेलेले आहेत. इंधनाच्या या वाढत्या किंमतींमुळे जनसामन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यातच कोरोनाचं संकट अद्यापही सुरुच असून सामान्य लोकांचं कंबरडं आधीच मोडून निघालं आहे. अशा परिस्थितीत महागाईशी दोन हात करण्यासाठी लोकांनी वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यानच, तमिळनाडूतील मदुराईमध्ये राहणाऱ्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांने एक हटके उपाय शोधून काढलाय. धनुष कुमार नावाच्या या विद्यार्थ्याने सौर उर्जेपासून चालणारी एक सायकल तयार केली आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी 'इतने तेजस्वी लोग है हमारे यहा' असं म्हणून या देशातील तरुणाईवरील विश्वास व्यक्त केलाय, तोच विश्वास एक तरुण साध्य करताना दिसतोय. सध्या ही सायकल खूपच चर्चेत आहे.

हेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळात 90 टक्के मंत्री कोट्यधीश, तर 42 टक्के...

हेही वाचा: 'आप'ची नजर उत्तराखंडवर, मोफत वीजेच्या आश्वासनावर CM धामींचं केजरीवालांना उत्तर

मदुराईचा रहिवासी असणाऱ्या धनुष कुमारने सोलर पॅनेलच्या मदतीने एक इलेक्ट्रीक सायकल बनवली आहे. या सायकलचं वैशिष्ट्य म्हणजे या सायकलला एकदा चार्ज केल्यावर ती जवळपास 50 किमीपर्यंतचा प्रवास करु शकते. बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर देखील ही 20 किमी पर्यंत चालू शकते. आणि यासाठी येणारा खर्च फक्त 1.50 रुपये इतकाच येतो. या वाहनाला सायकल आणि बाईक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येऊ शकतं.

धनुष कुमार यांनी सांगितलं की, ही सायकल 30 ते 40 किमी प्रति तास या वेगाने प्रवास करु सकते. मदुराईसारख्या लहान शहरात ही फाच उपयुक्त आहे. या सायकालमध्ये एक बॅटरी लावली आहे, जी सूर्याच्या प्रकाशामुळे चार्ज होते. धनुषची ही सायकल काही महिन्यांपूर्वीच चर्चेमध्ये आली होती. मात्र, आता पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे ही मदुराईमध्ये पुन्हा एकदा लोकप्रिय ठरली आहे.

loading image