केंद्र सरकारविरोधात तमिळनाडूचा शड्डू, मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय

Tamil Nadu मतदारसंघ पुनरर्चना विधेयकाच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय़ तामिळनाडूने घेतला आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
Thalapathy Vijay

Thalapathy Vijay

esakal

Updated on

चेन्नई, ता.८ (वृत्तसंस्था) : मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध करण्यासाठी तमिळनाडू सरकार राज्य विधिमंडळामध्ये ठराव मंजूर करणार आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. 'पुढील किमान ४० ते ५० वर्षे लोकप्रतिनिधींच्या जागांच्या संख्येमध्ये कोणताही बदल राज्याला परवडणारा नाही,' अशी भूमिका घेत उपस्थित नेत्यांनी फेररचनेला एकमुखाने विरोध दर्शविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com