भाजप नेत्यासह कार्यकर्त्यांना अटक; राज्य सरकारचा आदेश धुडकावत काढली यात्रा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 6 November 2020

मुरुगन देवाचा सन्मान म्हणून ही यात्रा काढण्यात येते. आजपासून सुरू होणाऱ्या या यात्रेची सांगता सहा डिसेंबरला होणार होती.

चेन्नई : तमिळनाडू सरकारने घातलेली बंदी धुडकावून वेत्री वेल यात्रा (मुरुग देवाच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या भाल्याची मिरवणूक) काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता.६) अटक केली.

सलाम! अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देण्यासाठी ट्राफीक पोलिस रस्त्यावर धावला​

मुरुगन देवाचा सन्मान म्हणून ही यात्रा काढण्यात येते. आजपासून सुरू होणाऱ्या या यात्रेची सांगता सहा डिसेंबरला होणार होती. पण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदा वेल यात्रेला परवानगी देता येणार नाही, असे तमिळनाडू सरकारने मद्रास उच्च न्यायालयात काल सुनावणीदरम्यान सांगितले होते. ही यात्रा मुस्लिम बहुल भागातून जाण्याची शक्यता असल्याने आणि राज्यातील जातीय सलोख्‍यात बाधा येण्याच्या भीतीने अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकारने यात्रेवर बंदी घातली. तिरुतनी येथील मुरुगन यांच्या मंदिरापासून ही यात्रा निघणार होती. तिरुचेंदूरमधील मंदिरात पोचल्यानंतर यात्रा समाप्त होणार होती. या दिवशी बाबरी मशीद पाडल्याचा स्मरण दिन आहे.

चीनच्या दबावाने LAC मध्ये बदल होणार नाही; जनरल बिपिन रावत यांची ठाम भुमिका​

मंदिरात पूजा करणे हा वैधानिक अधिकार
राज्य सरकारने परवानगी नाकारली तरी वेली यात्रा काढणारच, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यानुसार एल. मुरुगन हे शुक्रवारी तिरुवल्लूर जिल्‍ह्यातील मुरुगन मंदिराकडे रवाना झाले. ‘मंदिरात पूजा करणे हा माझा वैधानिक अधिकार आहे,’ असे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil Nadu Police Arrests State BJP Chief As Party Dares Government With Vel Yatra