चीनच्या दबावाने LAC मध्ये बदल होणार नाही; जनरल बिपिन रावत यांची ठाम भुमिका

bipin rawat
bipin rawat

नवी दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी म्हटलंय की पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या दरम्यान वास्तविक नियंत्रण रेषेवर अद्याप तणावपूर्ण स्थिती आहे. त्यांनी म्हटलं की सीमेवर दोन्ही सैन्य आमनेसामने आहेत आणि मोठ्या सैनिकी कारवाईसाठी सध्या परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यांनी म्हटलं की, कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण रेषेवर कसल्याही बदलास मंजूरी दिली जाऊ शकत नाही. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रावत यांनी म्हटलंय की, लडाखमध्ये भारतीय सैनिकांना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हटवादीपणामुळे अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या पोझिशनवर कोणतेही प्रश्न नाहीयेत. आम्ही वास्तविक नियंत्रण रेषेमध्ये कोणत्याही प्रकारच्या बदलांना स्विकारणार नाही, असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं आहे.

जनरल रावत यांनी नॅशनल डिफेंस कॉलेजद्वारे आयोजित एका वेबिनारमध्ये ही वक्तव्ये केली. त्यांनी म्हटलं की, भारत आणि चीनमध्ये मेमध्ये सुरु झालेल्या लडाखमधील तणावाला संपुष्टात आणण्यासाठी चर्चेच्या सात फेऱ्या झालेल्या आहेत. हा सगळा तणाव तेंव्हा शिगेला पोहोचला जेंव्हा जूनमध्ये चीनच्या सैन्याने गलवान घाटीमध्ये रक्तरंजित संघर्ष केला आणि त्यात भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला. 

त्यांनी म्हटलं की, ऑगस्टमध्ये चीनच्या सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या जवळील उंच डोंगरावर असलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. अनेक दशकांनंतर तिथे पहिल्यांदा गोळीबार झाला होता. 

त्यांनी यावेळी पाकिस्तानच्या स्थितीवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, पाकिस्तानचे सध्याचे आर्थिक संकट, फायनान्शियल ऍक्शन  टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या ग्रे यादीतून बाहेर पडण्याची असमर्थता, वाढता धार्मिक कट्टरतावाद आणि अंतर्गत सत्तेच्या संघर्षामुळे पाकिस्तान भविष्यात अस्थिरतेकडे आणखी ढकलला जाईल, असं ते म्हणाले.

भारतीय सैन्याच्या आत्मनिर्भरतेबाबत त्यांनी म्हटलं की, जसजसे भारताच्या कर्तृत्वाची उंची वाढत जाईल तसतसे सुरक्षेबाबतची आव्हाने देखील वाढत जातील. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या सैन्याच्या गरजांसाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर व्हायला हवं. त्यांनी पुढे म्हटलं की, आपल्याला सध्याच्या आणि भविष्यातील अडचणींना तोंड देण्यासाठी तसेच रणनीतीक स्वातंत्र्य आणि निर्णायक अशा सैन्य शक्तीसाठी दीर्घकालीक स्वदेशी क्षमतेच्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करावी लागेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com