धर्मांतर प्रकरणात पोलिसांची लपवाछपवी?, हायकोर्टाने दिले CBI चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 thanjavur student death case

धर्मांतर प्रकरणात पोलिसांची लपवाछपवी?, हायकोर्टाने दिले CBI चौकशीचे आदेश

तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलेल्या १७ वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून , तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) कडे हस्तांतरित करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी दिले.

न्यायमूर्ती जीआर स्वामिनाथन यांनी याचिकाकर्ता, मुलीचे वडील आणि शाळा व्यवस्थापन यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रकरण हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने सांगितले की, मुलीस मरणोत्तर न्याय मिळवून देणे हे या न्यायालयाचे कर्तव्य आहे. सध्याची स्थिती पाहाता तपास योग्य मार्गावर चालत नसल्याचे दिसून येते, तसेच एका उच्चपदस्थ मंत्र्याने स्वत: भूमिका घेतल्याने, राज्य पोलिसांकडे तपास होऊ शकत नाही. म्हणून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), नवी दिल्ली संचालकांना राज्य पोलिसांकडून तपास घेण्यासाठी एका अधिकाऱ्याला नियुक्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.आता सीबीआय या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करेल असे न्यायाधीश म्हणाले.

हेही वाचा: PM मोदी यूट्यूबवर देखील अव्वल, अनेक जागतिक नेत्यांना टाकलं मागे

तंजावर येथील मिशनरी शाळेतील १७ वर्षीय विद्यार्थिनी अरियालूर जिल्ह्यातील आहे. काही दिवसांपूर्वी तिने आत्महत्या केली होती. वसतिगृहात राहणाऱ्या या मुलीला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. दरम्यान शाळा व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले होते.

पोलिसांनी आरोपानुसार प्रकरणात धर्मांतराचा कोणताही मुद्दा नसल्याचे सांगितल्यानंतर. पीडितेच्या वडिलांनी प्रकरणाच्या सीबी-सीआयडी तपासाची मागणी केली होती. पोलिसांच्या निवेदनात तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या निवेदनात, मुलीने थेट आणि निःसंदिग्ध शब्दात वसतिगृहाच्या वॉर्डनवर तिच्यावर शैक्षणिक गैर-शैक्षणिक कामे सोपवून तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला होता आणि ते सहन न झाल्याने तिने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती.

हेही वाचा: ही इलेक्ट्रिक कार ठरतेय ग्राहकांची पसंत, एका चार्जमध्ये धावते 310km

Web Title: Tamil Nadu Police Tried To Hide Conversion Angle Says High Court Orders Cbi Probe Thanjavur Student Death Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tamil NaduCBI
go to top