

Fake Tehsildar Call Tricks Women
esakal
Tamil Nadu Head Shaving Scam: तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका गावातील महिलांना तहसीलदारांच्या नावाने एक कॉल आला आणि त्यांना टक्कल करण्यास सांगण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून जर तुम्ही टक्कल केले तर तु्म्हाला हा आजार होणार नाही शिवाय तुम्हाला १५००० रुपये देखील मिळतील असेही सांगण्यात आले. फोन करणाऱ्याने महिलांना घरातील सर्व सदस्यांचे तपशीलही सांगितले यावर महिलांचा विश्वास बसला त्यांनी सरकारी अधिकाऱ्याचा आदेश समजून मुंडण करुन घेतले.