रजनीकांत यांना आत्ताच फाळके पुरस्कार का दिला?

rajinikanth
rajinikanth

नवी दिल्ली- दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाली. पुरस्काराची घोषणा होताच रजनीकांत यांना आनंद झाला असेल की आश्चर्य वाटले असेल हे देवच सांगू शकेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानासाठी दादा साहेब फाळके पुरस्कार देण्यात येतो. रजनीकांत यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान नक्कीच नाकारता न येण्यासारखं आहे. जवळपास 5 दशकांपासून त्यांनी भारतीयांचं मनोरंजन केलंय. पण, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीला एक आठवडा शिल्लक राहिला असताना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे रजनीकांत यांना अवघडल्यासारखं झालं असेल हे नक्की. मोदी सरकार तमिळनाडूमध्ये सत्ताधारी AIADMK सोबत मिळून निवडणूक लढवत आहे. अशात रजनीकांत यांना पुरस्कार देऊन राजकीय लाभ घेण्याचा भाजपचा मानस स्पष्ट होतोयं. तरीही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुरस्कार देण्यामागे कोणतंही राजकारण नसल्याचं म्हणत असतील तर त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय असंच म्हणावं लागेल.

तमिळनाडूमध्ये 6 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होईल. रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री करावी यासाठी भाजपने फिल्डिंग लावली होती. 2016 ला रजनीकांत यांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आला, त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी राजकारणात येण्याचं जाहीर केलं. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली. पण, प्रकृतीच्या कारणास्तव ऐनवेळेला त्यांनी राजकारणात येण्याचं नाकारलं. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना जितकं दु:ख झालं (काहींना आनंद झाला) नसेल, त्यापेक्षा अधिक दु:ख भाजपला झालं. पण आता निवडणुकीच्या तोंडावर रजनीकांत यांना दादा साहेब फाळके पुरस्कार देऊन भाजपनं त्यांच्या लाखो चाहत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केलाय हे स्पष्ट आहे.

पत्रकाराने विचारलेल्या 'अवघड' प्रश्वावर प्रकाश जावडेकर भडकले!
 
दक्षिणेमध्ये रजनीकांत या नावाचं गारुड लोकांच्या मनावर आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची मंदिरं तमिळनाडूमध्ये असून लोक त्यांची देवासारखी पूजा करतात. रजनीकांत निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देतील अशी आशा भाजपला होती. तसं होऊ न शकल्याने भाजपने नवा फंडा वापरला आहे. रजनीकांत यांना पुरस्कार दिल्याने त्यांचे लाखो चाहते AIADMK-bjp युतीला मतदान देतील असं भाजपला वाटतं. रजनीकांत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी, सीएए अशा निर्णयांचे समर्थन केले होतं. 

जपानमध्ये चौथी लाट धोक्याची घंटा; टोकिओ ऑलिम्पिकवरही टांगती तलवार
 
दुसरा मुद्दा याठिकाणी लक्षात घेण्यासारखा म्हणजे सुपरस्टार कमल हसान हेही दादा साहेब फाळके पुरस्कारासाठी योग्य ठरतात. कमल हसन रजनीकांत यांच्यापेक्षा सिनिअर आहेत. जवळपास 6 दशके चित्रपटसृष्टीसाठीचे त्यांचे योगदान आहे. कमल हसन अगदी लहान वयापासून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी विविध भाषांच्या चित्रपटात काम केलंय . शिवाय त्यांनी चित्रपटात अभिनेता म्हणून अनेक प्रयोग केलेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना तिनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलंय. पण, दुर्दैवाने कमल हसन सध्या राज्यात भाजपच्या राजकीय विरोधकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी मोदींवर आणि त्यांच्या अनेक निर्णयांवर टीका केली आहे. त्यामुळे ते दादा साहेब फाळके पुरस्कारासाठी योग्य नाहीत, असं केंद्र सरकारला वाटलं असण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com