फक्त दहा रुपयात 'मोदी इडली'; अम्मा इडलीला देणार टक्कर

modi idli
modi idli

तिरुवनंतपूरम - तामिळनाडुत फक्त एका रुपयात पोट भरावं यासाठी राज्य सरकारकडूनच एक रुपयात इडली देण्याची व्यवस्था आहे. सरकारी अनुदान असलेल्या इडलीची सुरुवात दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरु केली होती. त्यामुळे या इडलीला अम्मा इडली असंही म्हटलं जातं. दरम्यान, आता या अम्मा इडलीला टक्कर देण्यासाठी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने मोदी इडली सुरु केली आहे. ही इडली सालेममधील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे अशी जाहीरातही करण्यात आली आहे. तामिळनाडु भाजपच्या प्रचार विभागाचे उपाध्यक्ष असलेल्या महेश यांनी रिक्षाच्या पाठिमागेच याची जाहीरात केली आहे. यामध्ये मोदी इडली फक्त दहा रुपयांना मिळत असल्याचं म्हटलं आहे. जाहीरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महेश यांचा फोटो आहे. 

महेश यांनी म्हटलं की, दररोज जवळपास 100 लोक रोजगारासाठी आणि अन्न धान्याची गरज असल्याचं सांगत कार्यालयात यायचे. यावर आम्ही विचार केला की, चांगल्या प्रतीचे अन्न पुरवणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे तमिळनाडूचे मुख्य अन्न असणारी इडली फक्त दहा रूपयात चार याप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला. यासाठी आम्ही अत्याधुनिक उपकरणांची खरेदी केली आणि ते बनवण्यासाठी आम्ही चांगल्या दर्जाचे तांदूळ, डाळ आणि फक्त शुद्ध पाणी वापरतो. लोकांना मदत व्हावी या हेतुनेच आम्ही हे करत असल्यचंही महेश यांनी सांगितलं.

तामिळनाडुत इतकी वर्षे चालणाऱ्या अम्मा इडलीहून मोदी इडलीचे वेगळेपण काय असे विचारले असता महेश म्हणाले की, "अम्मा इडली बनवण्यासाठी कमी प्रतीचा तांदूळ आणि डाळ वापरली जाते तर मोदी इडलीसाठी उत्कृष्ट गुणवत्तेचे तांदूळ आणि डाळ आम्ही वापरतो.

अम्मा इडली सेंटर हे दिवसाला १०० ते २०० इडलीच बनवतात. ती १ रुपयाला मिळत असली तरीही ती फक्त ५० ते १०० लोकच खरेदी करतात. मात्र मोदी इडली १० रुपयाला मिळत असून आम्ही दिवसाला चाळीस हजार इडल्या विकतो. यासाठी आम्ही खरेदी केलेले साहित्य हे २० लाखाचे असून दर पाच मिनिटाला आम्ही ९०० इडल्या बनवू शकतो. सालेममधील २२ सेंटरवरून आम्ही या इडल्या वितरित करणार आहोत. हे प्रत्येकाला परवडणारे असून पैश्यांची बचत करणारे देखील असल्याचं महेश यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com