पलानीस्वामी सरकारचा 16 मार्चला पहिला अर्थसंकल्प

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

अर्थमंत्री डी. जयकुमार हे पलानीस्वामी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत.

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार येत्या 16 मार्चला आपला पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. पलानीस्वामी यांनी गेल्या महिन्यात विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकला होता. 

 

सभापती पी. धनपाल यांनी त्या दिवशी सर्व सभासदांना सकाळी साडेदहाला सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सन 2017-18 च्या अर्थसंकल्पासाठी 16 मार्च हा दिवस ठरविला आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. अर्थमंत्री डी. जयकुमार हे पलानीस्वामी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्या 18 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी विधानसभेत 122 विरुद्ध 11 मतांनी सभागृहात विश्‍वासदर्शक ठराव जिंकला होता.
 

Web Title: tamilnadu : palanisami govt to put first budget on 16 march