मुख्यमंत्रीपदाकडे शशिकलांचे आणखी एक पाऊल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नवी दिल्लीः तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठीच्या शशिकला नटराजन यांच्या प्रयत्नांना आज (शुक्रवार) आणखी बळ मिळाले. शशिकला यांच्याविरोधातील दाव्याची सुनावणी तातडीने घेण्यास आणि त्यांच्या संभाव्य शपथविधीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 

भारताचे सरन्यायाधिश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने चेन्नईतील सेन्थिया कुमार यांची यासंदर्भातील याचिका निकालात काढली. जी. एस. मणी यांनी सेन्थिल कुमार यांच्यावतीने युक्तिवाद केला. 

दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी शशिकला सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याकडून सुत्रे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. पनीरसेल्वम यांनी राजिनामा देतानाच शशिकला यांच्यावर गंभीर आरोप केल्याने तमिळनाडूचे राजकारण ढवळून निघाले आहे. 

सेन्थिल कुमार यांच्या याचिकेत तमिळनाडूचे मुख्य सचिव, अण्णाद्रमुकचे सरचिटणीस आणि शशिकला यांना प्रतिवादी केले होते. शशिकला मुख्यमंत्री झाल्यास तमिळनाडूत दंगे उसळतील, अशी भीती याचिकेत व्यक्त केली होती. अवैध मालमत्ताप्रकरणी शशिकला यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल झाले असून त्याचा निकाल बाकी आहे. त्याची सुनावणी लवकर घ्यावी आणि तोपर्यंत शशिकला यांना शपथविधीपासून रोखावे, अशी मागणी सेन्थिल कुमार यांनी केली होती. 

Web Title: tamilnadus chinamma CM