बिहारचे माजी मंत्री एस.पी. तरुण यांचे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पाटणा / बिहार : बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र प्रसाद तरुण (वय 88) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. येथील पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले आहेत.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला असून, सरकारी इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार करणार असल्याचे जाहीर केले आहे; तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शोकसंदेशात तरुण हे एक प्रमुख राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे.

Web Title: tarun passes away