गोपनीय माहिती उघड केल्याबद्दल मिस्त्रींना नोटीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - टाटा समूहातील संवेदनशील आणि गोपनीय माहिती उघड केल्याचा म्हणत टाटा सन्सने सायरस मिस्त्रींना गोपनियतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावली आहे. टाटा सन्सने कंपनी लवादाकडे केलेल्या तक्रारीत मिस्त्रींनी समूहातील संवेदनशील आणि गोपनीय माहिती असणारे दस्तऐवज उघड केल्याचा आरोप केला आहे.

सायरस मिस्त्री यांच्या वतीने सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांनी काही दिवसांपुर्वी टाटा सन्समधील गैरकारभाराबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतली होती. टाटा समूहात नियम धाब्यावर बसवून कार्यभार चालविला जात आहे. त्यामुळे टाटा सन्सचे संचालक मंडळ बरखास्त करावे, रतन टाटांना संचालक बैठकांपासून दूर ठेवणे, मिस्त्रींच्या इतर कंपन्यांमधील हकालपट्टीला तूर्तास बेकायदेशीर ठरवण्याची विनंती मिस्त्री यांच्या वतीने लवादाकडे करण्यात आली. या याचिकेत कंपनीतील गोपनीय माहिती समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये संचालक मंडळातील बैठकीचा वृत्तांत, आर्थिक माहितीसह अन्य काही संवेदनशील आणि गोपनीय माहिती मिस्री यांनी याचिकेमध्ये समाविष्ट केल्याचा दावा टाटा सन्सने केला आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटविल्यानंतर प्रथमच टाटा सन्सने मिस्त्रींविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

दरम्यान, मिस्त्री यांनी टाटा सन्सविरोधात केलेली तक्रार कायद्याच्या चौकटीत नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. मिस्त्री यांना पुढील आठवडाभरात नव्याने तक्रार सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

Web Title: Tata Sons serves legal notice on Cyrus Mistry for breach of confidentiality