esakal | कोरोनाच्या संकटात रतन टाटांचा पुन्हा मदतीचा हात; ऑक्सिजनचा करणार पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

ratan tata

कोरोनाच्या संकटात रतन टाटांचा पुन्हा मदतीचा हात; ऑक्सिजनचा करणार पुरवठा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जगात कोरोना महामारी पुन्हा फोफावत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून तिचा वेग पहिल्या लाटेपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी राज्यात अडीच लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची स्थिती गंभीर बनताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि दुसरीकडे आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. अनेक हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांनी रांगा लावण्याचे चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर टाटा स्टील मदतीसाठी पुढे आली असून दररोज 300 टन ऑक्सिजन पुरवणार असल्याचं जाहीर केलंय.

कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असतो. अशावेळी जास्तीच्या ऑक्सिजनची आवश्यकता लागते. देशात वैद्यकीय कामासाठी ऑक्सिजन निर्मिती केली जाते, पण सध्या याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी काही कंपन्या कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. आता टाटा स्टिलने दरदिवशी वेगवेगळ्या राज्यांना 300 टन ऑक्सिजन पुरवणार असल्याचं जाहीर केलंय.

हेही वाचा: Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ; मृतांचा आकडा 500 च्या पार

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन किंवा LMO कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असते. टाटा स्टीलने यासंबंधी ट्विट करत म्हटलंय की, ''देशातील आणीबाणी लक्षात घेत आम्ही दरदिवशी 200 ते 300 टन वैद्यकीय ऑक्सजनचा पुरवठा राज्यांना आणि हॉस्पिटल्सांना करण्याचा निर्णय घेतला.'' देशातील सर्वात मोठ्या स्टिल उत्पादक कंपनीने असंही सांगितलं की, आतापर्यंत 33,300 टन ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे टाटाकडून याआधीही कोरोना रुग्णांना मदत झाली आहे. मागीलवर्षी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना टाटाकडून जेवण पुरवण्यात आले होते.

हेही वाचा: कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?

शुक्रवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत बैठक घेतली होती. देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्टिल फॅसिलिटी कंपन्यातील खासगी आणि सरकारी क्षेत्रातील 28 केंद्राकडून 1500 टन ऑक्सिजनचा पुरवठा दिवसाला करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करताना दिसत आहे.