Cyclone : पेट्रोल पंपाला तडाखा; फळबागांचेही नुकसान

तौक्ते चक्रीवादळाचे केंद्र सध्या सौराष्ट्रावर असून त्याचा उत्तर-ईशान्येकडे प्रवास होत जाईल. यावेळी त्याची तीव्रता कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Tauktae Cyclone
Tauktae CycloneANI

तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी (ता.१७) रात्री गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याला धडक दिली. यावेळी चक्रीवादळाचा वेग १८५ किमी प्रतितास होता. वादळी वाऱ्यामुळे गुजरातच्या अनेक भागांचं नुकसान झालं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या किनारपट्टी भागातील सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची ५४ पथकं मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली होती. (tauktae cyclone live updates Gujarat Maharashtra Mumbai Kokan IMD)

  • जोरदार वारे आणि पावसामुळे सूरत आणि अहमदाबादमधील रस्त्यांवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. ती हटविण्याचे काम सुरू आहे.

  • अमरेलीमधील एका पेट्रोल पंपाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. काही ठिकाणी विजेचे खांब तसेच झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर उभी केलेल्या वाहनांवर झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.

  • जुनागढमधील फळबागांचे नुकसान झाले होते.

  • जुगोवा : वेंगुर्ला लाईट हाऊस येथे अडकलेल्या २ कर्मचाऱ्यांना गोवा तटरक्षक दलाने चेतक हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी पोहोचवले. वेगवान वाऱ्यामुळे लाईट हाऊसचे नुकसान झाले होते.

  • उदय सामंत पाहणी दौऱ्यावर

    तौत्के चक्रीवादळाच्या (Tauktae cyclone) पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.१८) उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची पाहणी केली. नाणीज येथून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू केला. आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना आधार देत तत्काळ मदत करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत ते पाहणी दौर्‍यावर असतील.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता पुढील तीन तासांत कमी होणार अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

  • गेल्या २३ वर्षातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ

    तौक्ते चक्रीवादळ हे गुजरातमध्ये गेल्या २३ वर्षात धडकणारे सर्वात शक्तिशाली वादळ ठरलं आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

  • हवेची गती झाली कमी

    गुजरातमधील नागरिकांनी आता घाबरण्याचे काही कारण नाही. हवेची गती कमी झाली असून पाऊसही थोडा कमी पडत आहे. राजस्थानमध्येही पाऊस पडेल, पण घाबरण्याचे कारण नाही. यंदा कोरोनाचे सावट असल्याने ऑक्सिजन, आवश्यक औषधे यांच्या पुरवठ्यात कोणताही खंड पडू नये, असे वाटत होते. चक्रीवादळ आणि कोरोना अशा दोन्ही संकटांचा सामना करायचा होता. कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, अशी माहिती एनडीआरएफचे डीजी एस.एन.प्रधान यांनी दिली.

  • तौक्ते चक्रिवादळानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील दृश्य

  • तौक्ते चक्रिवादळामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 40 हजार झाले कोसळली आहेत. तसेच 16 हजारांपेक्षा जास्त झोपड्यांध्ये पाणी गेलं आहे. विजय रुपानी, मुख्यमंत्री गुजरात

  • गुजरातला तौक्तेचा तडाखा, सुरतमध्ये रस्त्यावर झाडे कोसळली.

  • तौक्ते चक्रिवादळानं गुजरातमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजौला आणि अम्रेली येथील छायाचित्र चक्रिवादळाचा प्राभव स्पष्ट करत आहेत...

  • गोव्यात एनडीआरएफ पथक रस्त्यावरील अडथळा दूर करताना

  • पंचनाम्याशिवाय कोणतीही मदत नाही- वडेट्टीवार

    पंचनामे मॅन्युअली होतात, त्यामुळे अनेकदा मदतीसाठी विलंब होतो. पंचनाम्याशिवाय कोणतीही मदत नाही, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी स्पष्ट केलं. कोकणातील नागरिकांना महाविकासआघाडी निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. दोन तीन दिवसांमध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार असून, प्रभावित जिल्ह्यांना तातडीने मदत पोहोचण्यात येणार आहे.

  • अरबी समुद्रात एक जहाज बुडाले

  • अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मुंबईजवळ दोन मोठी जहाजे सोमवारी (ता.१७) सकाळी बिघाड होऊन भरकटल्याने त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी खवळलेल्या समुद्रात नौदलाच्या दोन युद्धनौकांना जावे लागले. या दोन जहाजांमध्ये सुमारे चारशे खलाशी-प्रवासी होते. यापैकी १४६ जणांची सुटका करण्यात आली आहे.

  • भरकटलेल्या जहाजांपैकी ‘पी ३०५’ जहाज मुंबई हायमधील हिरा तेल उत्खनन विहिरींच्या दिशेने भरकटत गेल्याचे समजते. या जहाजावर २७३ कर्मचारी-खलाशी होते. त्यांनी नौदलाकडे मदत मागितल्यावर नौदलाची ‘आयएनएस कोची’ ही युद्धनौका मदतीसाठी गेली. ‘जीएएल कन्स्ट्रक्टर’ हे दुसरेही जहाज समुद्रात बंद पडून भरकटल्याचा संदेश नौदलाला मिळाल्यानंतर त्याच्या मदतीसाठी आयएनएस तलवार ही युद्धनौका संध्याकाळी नौदल गोदीतून निघाली होती. या जहाजावर १३७ खलाशी होते.

  • अरबी समुद्रात सुरू असलेली बचाव मोहिम गेल्या २२ तासांपासून सुरू आहे. पी ३०५ हे जहाज बुडाल्याचे मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आले. मुंबई हाय जवळच्या समुद्रात ही घटना घडली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत २७३ जणांपैकी १४६ जणांची सुटका करण्यात आली आहे. आणि अजूनही बचावकार्य सुरू आहे.

  • दरम्यान, चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी नौदलाची बचाव पथके आणि हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे कोणताही अनुचित प्रसंग उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी मुंबईत कुलाबा, वरळी, घाटकोपर, मानखुर्द, मालाड येथे नौदलाची पूरपरिस्थितीसाठीची बचाव आणि मदत पथके सज्ज आहेत.

  • तातडीच्या बचावकार्यासाठी नौदलाची सी किंग व चेतक हेलिकॉप्टरदेखील आयएनएस शिक्रा या हवाई तळावर सज्ज आहेत. हवामान अनुकूल असल्यास मदत व बचावकार्यासाठी ही हेलिकॉप्टरदेखील उड्डाण करू शकतील, असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

  • आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू

  • गुजरात किनारपट्टीला धडकेपर्यंत चक्रीवादळाचा प्रवास महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोवा या राज्यांच्या सीमेवरून झाला. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १८५ ते २१० किमी इतका प्रचंड होता. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत १४ जणांचा आपला जीव गमवावा लागला असून लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

  • कर्नाटकात आठ तर महाराष्ट्राच्या रायगड, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन नौका समुद्रात बुडल्याने तीन नाविक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

  • तौक्ते चक्रीवादळाचे केंद्र सध्या सौराष्ट्रावर असून त्याचा उत्तर-ईशान्येकडे प्रवास होत जाईल. यावेळी त्याची तीव्रता कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. गिर सोमनाथ, अमरेली, सूरत भागात जोरदार वारे वाहत होते. दक्षिणेकडील भागात अरबी समुद्रात अजूनही ढग जमा होत आहेत. त्यामुळे मुंबई, पालघर, नाशिक परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com