राजकीय पक्षांच्या जुन्या नोटा करमुक्त

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

सरकारने राजकीय पक्षांच्या खात्यावर जमा नोटांवर प्राप्तीकर लावणार नसल्याचे सांगतानाच राजकीय पक्षांची मिळणारी व्यक्तिगत स्वरुपातील देणगी ही 20 हजार रुपयांपेक्षा कमी असावी; तसेच त्याची कागदपत्रेही जमा करावी लागणार आहेत.

नवी दिल्ली - एकीकडे जनधनच्या खात्यासह सर्व खात्यांवरील रकमांची पडताळणी होत असताना आता केंद्र सरकारने राजकीय पक्षांच्या खात्यावर जमा करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर कोणताही कर लावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर टीका केली आहे.

सरकारने राजकीय पक्षांच्या खात्यावर जमा नोटांवर प्राप्तीकर लावणार नसल्याचे सांगतानाच राजकीय पक्षांची मिळणारी व्यक्तिगत स्वरुपातील देणगी ही 20 हजार रुपयांपेक्षा कमी असावी; तसेच त्याची कागदपत्रेही जमा करावी लागणार आहेत. पक्षांच्या करमुक्त रकमेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, एखाद्याच्या वैयक्तिक खात्यावर जमा होत असलेल्या रकमेबाबत चौकशी होणार असल्याचे, हसमुख अधिया यांनी सांगितले.

राजकीय पक्षांच्या खात्यात 20 हजारांपेक्षा अधिकची रक्कम ही सध्याच्या कायद्यानुसार चेक किंवा डीडीच्या माध्यमातूनच भरता येणार आहे. यामध्येही सरकारने कोणता बदल केलेला नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्नही करमुक्त असले तरी त्यांना त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे घोषणापत्र द्यावे लागणार आहे. यामुळे पॅनकार्डची आवश्यकता भासणार नाही. 

Web Title: tax exemptions to political parties subject to conditions government