esakal | 2022 मध्ये TCS, Infosys, Wipro कंपन्यांत एक लाख फ्रेशर्सना संधी
sakal

बोलून बातमी शोधा

TCS, Infosys, Wipro

2022 मध्ये TCS, Infosys, Wipro कंपन्यांत 1 लाख फ्रेशर्सना संधी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे जगभरातील सर्व उद्योग क्षेत्रांमध्ये मोठा फटका बसला आहे. या संकटाच्या काळात देखील आयटी क्षेत्राने मात्र वेगवान तेजी दर्शविली आहे. वित्तीय वर्ष 21 च्या सुरूवातीस मंदावलेल्या भरती प्रक्रियेत 9,000 ची घट दिसून आली होती. मात्र, या चालु वित्तीय वर्षात आता त्यामध्ये 40,000 ची भर पडली. (tcs infosys wipro plan hire in 1 lakh freshers in financial year 2022)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) , इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) या तीन भारतातील सर्वात मोठ्या टेक सर्व्हिसेस सेक्टरमधील आर्थिक वर्षांसाठी आक्रमक योजना आखली असून त्यांचे या वर्षामध्ये 1 लाख फ्रेशर्स भरती करण्याचे उद्दीष्ट आहे. टीसीएसने पहिल्या तिमाहीत 20,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कंपनीत भर घातली आहे. ही एका तिमाहीतील सर्वाधिक वाढ आहे. भारतात गुणवत्तेची मागणी वाढत असताना इन्फोसिसने 8,300 कर्मचारी आणि विप्रोने 12,000 नवीन कर्मचारी भरती केले आहेत.

टीसीएस (TCS)

टीसीएसने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात ते भारतभरातील कॉलेजमधून 40,000 फ्रेशर्स भरती करतील. भारतातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिस फर्मकडे आधीच पाच लाखाहून अधिक लोक आहेत आणि या क्षेत्रातील सर्वात मोठे employer आहेत.

2020 मध्ये या कंपनीने 40,000 पदवीधरांची भरती केली असून, या वेळी त्यांचे टारगेट त्यापेक्षा मोठ्या संख्येने भरती करण्याचे असल्याचे टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लकड यांनी सांगितले. कंपनीने मागील वर्षी अमेरिकन कॅम्पसमधून 2 हजार प्रशिक्षणार्थी घेतले होते; यावर्षी देखील ती संख्या जास्त असणार असल्याचे ते म्हणाले.

लाकड म्हणाले की, कोरोनामुळे सर्व देशभर असलेला निर्बंधामुळे कामावर लोकांना घेण्यासंबंधी अडचणी येत नाहीत. ते म्हणाले की, कोविड असतानाही गेल्या वर्षी अक्षरशः तीन लाख 60 हजार फ्रेशर्स ऑनलाईन प्रवेश परीक्षेला उपस्थित होते. मागील वर्षी आम्ही भारतातल्या कॅम्पसमधून 40,000 लोकांना कामावर घेण्यात आले होते. तर यावर्षी भारतात 40,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना भरती करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

हेही वाचा: 'भेकड आणि संघ विचारसरणीच्या लोकांनी काँग्रेसपासून लांब रहावं'

इन्फोसिस (Infosys)

महाविद्यालयीन पदवीधरांना भरती करण्याच्या कार्यक्रमाचा जागतिक स्तरावर सुमारे 35,000 पर्यंत विस्तार करण्याची इन्फोसिसची योजना आहे. जून 2021 तिमाहीच्या शेवटी इन्फोसिसमध्ये एकूण 2,67,953 लोक काम करत होते.

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी सांगीतले की, डिजिटल टॅलेंटची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे उद्योगातील वाढ ही जवळपास एक आव्हान ठरू शकते. महाविद्यालयीन पदवीधरांना भरती करत आमच्या प्रशिक्षण वर्षाच्या जागतिक स्तरावरील भरती कार्यक्रमाचा विस्तार करून ही मागणी पूर्ण करण्याची आमची योजना आहे.

हेही वाचा: पुढील शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा

विप्रो (Wipro)

कंपनीच्या आयटी सेवा कर्मचार्‍यांच्या एकूण संख्येने 2 लाखांचा टप्पा पार केला असून ही संख्या जून 2021 मध्ये 2,09,890 होती. या दरम्यानच विप्रोने 5 वर्षाच्या कालावधीत 750 दशलक्ष डॉलर्सची पहिली डॉलर-बोनस ऑफर जारी केली.

2022 च्या पहिल्या तिमाहीत 10,000 हून अधिक लोक Latrell हायर केले गेले होते, त्यामध्ये जवळपास 2,000 फ्रेशर्स होते. विप्रोची दुसऱ्या तिमाहीत 6,000 फ्रेशर्स घेण्याची योजना आहे. विप्रोने आर्थिक वर्ष 23 मध्ये 30,000 लोकांना भरती करुन घेण्याची योजना आखली असून त्यातील 22,000 फ्रेशर्स असतील.

(tcs infosys wipro plan hire in 1 lakh freshers in financial year 2022)

loading image