
केंद्राचा निर्णय; चहा-कॉफी, मसाल्यासंदर्भात कायदे लवकरच बदलणार?
नवी दिल्ली : भारत सरकारकडून (Central Government) लवकरच चहा, कॉफी, रबर आणि मसाल्याशी (Spices) संबंधित जुने कायदे रद्द करण्यात येणार आहेत. सरकारच्या वरिष्ठ पातळीवर तसा विचार सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. यासंदर्भातील सर्व जुने कायदे (Old laws) रद्द करून त्याजागी नवीन कायदे आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या निर्णयावर अमंलबजावणी केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: शिक्षणाशी संबंध नसलेल्या लोकांचा आंदोलनात सहभाग - बच्चू कडू
दरम्यान, याबाबत वाणिज्य मंत्रालयाने म्हटल्यानुसार, आगामी काळात चहा, कॉफी, मसाले आणि रबराशी संबंधित जुने कायदे रद्द करण्यात येणार आहेत. चहा कायदा-1953, मसाले बोर्ड कायदा-1986, रबर कायदा-1947 आणि कॉफी कायदा-1942 हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या गरजा आणि उद्दिष्टांशी सुसंगत होण्यासाठी हे कायदे रद्द करुन नवीन कायदे आणण्याचा प्रस्ताव आहे. या चहा, कॉफी मसाले आणि रबर उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित सध्या जुन्याच कायद्यांचा वापर सुरु आहे. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्याने वस्तुंच्या विपणन आणि वापरामध्ये बदलही झाला आहे. शिवाय ग्राहकांची त्याप्रमाणे मागणी आहे. त्यामुळे सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.
चहा, कॉफी, मसाले आणि रबर उत्पादनाच्या विपणन आणि उत्पादनाशी संबंधित भारतामध्ये असणारे कायदे जुने आणि इंग्रजकालीन आहेत. तेव्हाच्या गरजा वेगळ्या होत्या मात्र आता त्यामध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे जुने कायदे रद्द करून सध्याच्या धोरणाला सुसंगत अशा नव्या कायद्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे हे जुने कायदे बदलण्याची आवश्यकता असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: निवडणूक प्रचार सभांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली
Web Title: Tea Coffee Spices Law Changes Soon Replace To British Rule Central Govt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..