राजस्थान : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार; शिक्षक गजाआड | Rajasthan crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape case
राजस्थान : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार; शिक्षक गजाआड

राजस्थान : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार; शिक्षक गजाआड

जयपूर : राजस्थानच्या (rajasthan) करौली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर (Minor girl rape case) एका नराधम शिक्षकाने बलात्कार केला आहे. आरोपी शिक्षकावर आयपीसीच्या सेक्शन (ipc section) ३७६ अंतर्गत पोक्सो कायद्यान्वये (pocso act) गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली (teacher arrested) आहे. इंडिया टुडेनं असं वृत्त दिलं आहे. (Teacher arrested in minor school girl rape case in rajasthan karauli)

हेही वाचा: मुंबई : तलवारीनं केक कापला, बर्थ डे बॉय जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी मंगळवारी शाळेत गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या आईने शाळेत जाऊन तिची शोधाशोध केली. त्यानंतर एका बंद खोलीत पीडित मुलगी रडत असल्याचा आवाज तिच्या आईला ऐकू आला. त्यानंतर तिने दरवाजा जोरात उघडल्यावर तिच्या मुलीसोबत आरोपी शिक्षकाला पाहिलं.

त्यावेळी पीडितेच्या आईला आरोपीने धक्का देत तेथून पळ काढला. त्यानंतर पीडित मुलीनं घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. याप्रकरणाची त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेत आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. गेल्या तीन महिन्यात शाळकरी मुलींवर होणाऱ्या विनयभंगाच्या आणि बलात्काराची चार प्रकरणं राजस्थानमध्ये घडली आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rajasthancrime update
loading image
go to top