

दिल्लीत केंद्रीय शाळेत शिकवणाऱ्या २९ वर्षीय महिला शिक्षिकेनं गळफास घेत आत्महत्या केली. तिनं आत्महत्येआधी आई-वडील आणि भावाला व्हॉटसअपवर शेवटचा मेसेज केला. त्यात तिनं म्हटलं की, आता पतीचे टोमणे सहन करू शकत नाही. ते माझ्या प्रत्येक कामात चूक शोधतात. सासरच्या मंडळींना तर फक्त घेणंच माहितीय. अन्विता शर्मा असं आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे.