
प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी ३ ते १० मे दरम्यान प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवला होता. यात एका ४५ वर्षीय व्यक्तीनं लग्न होत नसल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी आपल्याकडे भरपूर जमीन असल्याचंही सांगितलं होतं. यानंतरच एका दाम्पत्यानं कट रचून त्याच्याशी महिलेचं लग्न लावलं आणि लग्नाच्या रात्रीच त्याची हत्या केली. इंद्रकुमार तिवारी असं त्याचं नाव आहे.