Teachers' Day: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश (Messages) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers' Day

Teachers' Day: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश (Messages)

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस 5 सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. असे म्हणतात की गुरूशिवाय ज्ञान नसते, गुरुच आपल्याला शिक्षणाचे ज्ञान देतो. गुरु शिक्षण देतात, पालक संस्कार देतात.म्हणून आपण नेहमी आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे. गुरूंचे आभार मानण्यासाठी शिक्षक दिन हा सर्वोत्तम दिवस आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना शुभेच्छा पाठवल्या पाहिजेत.शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या शिक्षकांना धन्यवाद/आभार व्यक्त केले पाहिजे.

● जगण्याची कला शिकवतात शिक्षक

ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक

फक्त पुस्तक असून नाही काही फायदा

जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा .

● जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे.

तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही,

फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन

जगणंही शिकवता तुम्ही.

शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

● जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे

शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस

बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी

आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना

शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

● गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

शिक्षक दिनाच्या सर्वगुरूंना शुभेच्छा.

● माता गुरू आहे, पिताही गुरू आहे.

विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.

ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला

मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.

या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व

गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.

● गुरूचा महिमा ना कधी होणार कमी,

तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती,

गुरूचं देतो चांगल्या-वाईटाचं ज्ञान,

तेच घडवतात जीवनात

वाईट गोष्टींची जाण.

● तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच

शिकवलं लिहायला, गणितही शिकलो

तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो

तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला.

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा

● कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि

करूणा तुमच्यात हे सर्व आहे.

तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण

व्यक्तींपैकी एक आहात.

● देवाकडे

तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल

खूप खूप आभार.

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे

आशिर्वादापेक्षा कमी नाही.

माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.

शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

● तुम्ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहात

तुम्हीच माझे गाईड आहात.

माझ्या जीवनातील प्रकाश स्तंभ आहात.

मनापासून तुम्हाला धन्यवाद.