"टीम राहुल'मध्ये वासनिक, पांडे, सातव 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

बहुचर्चित आणि दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीची घोषणा आज रात्री करण्यात आली. पूर्ण वेळ 23 सदस्य यात असून, 18 जणांना कायम निमंत्रित व दहा जणांची विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या 23 सदस्यांमध्ये मुख्यतः प्रमुख व वजनदार नेत्यांचा समावेश असला, तरी काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. सिद्धरामय्या, हरीश रावत, ओमेन चंडी, अशोक गेहलोत व तरुण गोगोई यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र, दिग्विजय सिंह, जनार्दन द्विवेदी, सुशीलकुमार शिंदे, वीरप्पा मोईली यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक 22 जुलैस होण्याची शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली- बहुचर्चित आणि दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीची घोषणा आज रात्री करण्यात आली. पूर्ण वेळ 23 सदस्य यात असून, 18 जणांना कायम निमंत्रित व दहा जणांची विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या 23 सदस्यांमध्ये मुख्यतः प्रमुख व वजनदार नेत्यांचा समावेश असला, तरी काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. सिद्धरामय्या, हरीश रावत, ओमेन चंडी, अशोक गेहलोत व तरुण गोगोई यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र, दिग्विजय सिंह, जनार्दन द्विवेदी, सुशीलकुमार शिंदे, वीरप्पा मोईली यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक 22 जुलैस होण्याची शक्‍यता आहे. 

कार्यकारिणीच्या पूर्ण वेळ सदस्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे या दोन्ही विदर्भवासीयांना देण्यात आले आहे. परंतु, कायम निमंत्रितांमध्ये बाळासाहेब थोरात यांचा समावेश करून पश्‍चिम महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. थोरात हे गुजरात विधानसभा निवडणुकीत उमेदवार छाननी समितीत होते व त्या काळात त्यांच्या संघटन कौशल्यामुळे ते राहुल गांधी यांच्या नजरेत आले व त्याची पावती त्यांना यानिमित्ताने मिळाली आहे. याखेरीज रजनी पाटील आणि राजीव सातव या दोन राज्य प्रभारींचाही यामध्ये समावेश आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना वगळण्याची बाब काहीशी आश्‍चर्यकारक मानावी लागेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील रचनेत स्थान नाकारण्यात आले, हे आणखी एक आश्‍चर्य आहे. 

कार्यकारिणीचे पूर्ण सदस्य - राहुल गांधी (अध्यक्ष), सोनिया गांधी, मनमोहनसिंग, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमेन चंडी, तरुण गोगोई, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, हरीश रावत, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीणा, गाइखांगम आणि अशोक गेहलोत. 

कायम निमंत्रित - शीला दीक्षित, पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य शिंदे, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कर्रा, पी. सी. चाको, जितेंद्रसिंह, आर. पी. एन. सिंह, पी. एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुंटिया, अनुग्रह नारायणसिंग, राजीव सातव, शक्तिसिंग गोहिल, गौरव गोगोई, डॉ. ए. चेल्ला कुमार. 

विशेष निमंत्रित - के. एच. मुनियप्पा, अरुण यादव, दीपेंद्र हुड्डा, जितिन प्रसाद, कुलदीप बिश्‍नोई आणि इंटक, युवक कॉंग्रेस, एनएसयुआय, महिला कॉंग्रेस व कॉंग्रेस सेवा दल या आघाड्यांचे प्रमुख. 

Web Title: in team of rahul gandhi wasnik pande and satav in to maharashtra