'आयसीयू'तील बालिकेवर सामूहिक बलात्कार 

वृत्तसंस्था
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

पीडित मुलीला सापाने चावा घेतल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जात होते. मात्र, तिला जनरल वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

बरेली : एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित बालिका उत्तरप्रदेशच्या बरेली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. त्यादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला जात आहे.

पीडित मुलीला सापाने चावा घेतल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जात होते. मात्र, तिला जनरल वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक ए. सिंग यांनी दिली. तसेच याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

 

Web Title: Teen raped inside ICU allegedly by hospital staff