esakal | 16 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये PM मोदींना म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

16 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये PM मोदींना म्हणाला...

16 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये PM मोदींना म्हणाला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या मध्य प्रदेशमधील एका 16 वर्षीय मुलानं रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ग्वालियर येथील कँसर रुग्णालय पर्वतरांगा येथे ही घटना घडली आहे. मौनी बाबा मंदिराजवळ राहणारा अकरावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय अज्जू याला डान्सर व्हायचं होतं. मात्र कुटुंबियांचा विरोध होता. यामुळे तो सतत दु:खी राहत होता. अन्हे स्वप्न पूर्ण होणार नसल्यामुळे नैराश्यात गेला. यातूनच अज्जूनं टोकाचं पाऊल उचलत रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

येथे परिसरातील रेल्वे पटरीवर मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. झांसी रोड पोलिसांनी तात्काल घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान, अज्जूला कुठलाही त्रास नव्हता, त्याने हे पाऊल का उचचले हे आम्हाला समजत नाही, असे त्याच्या घरच्यांनी म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी अज्जूकडील सुसाईड नोट आढळून आली. या सुसाइड नोटमध्ये अज्जूने थेट पंतप्रधान मोदींकडे आपली अंतिम इच्छा बोलून दाखवली आहे.

यामध्ये अज्जूने म्हटलेय की, ' केंद्र सरकारने माझीही अंतिम इच्छा पूर्ण करावी, मला सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे, माझ्या मृत्यूनंतर माझ्यावर एक गाणं तयार करण्यात यावं. नेपाळचे रहिवाशी असलेले माझे आवडते डान्सर सुशांत खत्रींनी या गाण्याची कोरिओग्राफी करावी. हे गाणं देशातील सर्वात मोठे गायक अरजितसिंग यांनी गावं. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी पंतप्रधानांनाही विनंती करतो की, त्यांनी माझी इच्छा पूर्ण करावी.'

16 वर्षीय अज्जू याने सुसाईड नोटमध्ये आई-बाबांचीही माफी मागितली आहे. मी एक चांगला मुलगा बनू शकलो नाही. मी स्वार्थी आहे, जो कुटुंबाला सोडून जात आहे. चांगला डान्सर व्हायची माझी इच्छा होती, मात्र मला कुणीही सपोर्ट केला नाही. मी माझ्यासोबत अनेक गुपितं घेऊन जात आहे, असेही अज्जूने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

loading image
go to top