Gujarat riots: नरेंद्र मोदींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून...धक्कादायक माहिती उघड

आरोपींना नरेंद्र मोदींची राजकीय कारकिर्द संपवायची होती आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवायचा होता असा दावा एसआयटीाने केला आहे.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीsakal
Updated on

गुजरात सरकारची बदनामी करण्याचा कट आखल्याचा तसंच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कट आखण्यात आला होता. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपींना नरेंद्र मोदींची राजकीय कारकिर्द संपवायची होती आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवायचा होता असा दावा एसआयटीाने केला आहे. (Teesta Setalvad plotted for death sentence to Narendra Modi in 2002 riots SIT )

२००२च्या गुजरात दंगल प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हे दोषारोपपत्र दाखल केलं असून तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदी
Supreme Court: हिजाब मुलांना सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील बनवू शकतो

विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कट आखला होता. सरकारचा भाग असतानाही आर. बी. श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांनी तिस्ता यांच्यासाठी खोटी कागदपत्रं तयार केली आणि नंतर त्यांचा अधिकृत कागदपत्रांमध्ये समावेश केला.

दोषारोपपत्रातील दाव्यानुसार, आरोपींना नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकिर्द संपवायची होती आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवायचा होता. खोटी कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी वकिलांची एक फौजच त्यांनी तयार केली होत.

नरेंद्र मोदी
Uddhav Thackeray: तर तुमच्या कुळाला बट्टा लावलात...बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना उत्तर

दंगलीतील पीडितांची फसवणूक करत जबरदस्तीने खोट्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आल्या. कागदपत्रं इंग्रजीत असल्याने पीडितांना आपण कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत आहोत याची कल्पना नव्हती असा एसआयटीचा दावा आहे. तिस्ता सेटलवाड यांनी पीडितांना मदत केली न केल्यास परिमाण भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती असंही एसआयटीने सांगितलं आहे.

सहआरोपी असणारे आय़पीएस अधिकारी तिस्ता सेटलवाड यांना मदत करत होते. आर बी श्रीकुमार यांनी तर एका साक्षीदारालाही धमकावलं होतं असा एसआयटीचा दावा आहे. जर तुम्ही तिस्ता सेटलवाड यांनी मदत केली नाही, तर मुस्लीम तुमच्याविरोधात उभे राहतील आणि दहशतवादी तुम्हाला लक्ष्य करतील. जर आपण आपापसात भांडत राहिलो तर शत्रूला आणि मोदींना याचा फायदा होईल, असं श्रीकुमार यांनी एका साक्षीदाराला सांगितल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com