Uddhav Thackeray: तर तुमच्या कुळाला बट्टा लावलात...बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना उत्तर

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपावर सडकून टीका केली.
Chandrashekhar Bawankule Replied To Uddhav Thackeray On Dynasty Alligation
Chandrashekhar Bawankule Replied To Uddhav Thackeray On Dynasty Alligation esakal
Updated on

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपावर सडकून टीका केली. यावेळी भाजपाने पक्षात केवळ उपरे भरून ठेवले आहेत की आता तुमचे बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Chandrashekhar Bawankule Replied To Uddhav Thackeray On Dynasty Alligation )

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटची मालिका शेअर करत उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. 'तयार राहा. अमित शहा भाईंवर टीका करण्यापूर्वी उद्धवराव आधी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा.' अशा शब्दात प्रत्युत्तर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

Chandrashekhar Bawankule Replied To Uddhav Thackeray On Dynasty Alligation
राज्यात दररोज ७ शेतकरी आत्महत्या! cm शिंदेंची 'एकही आत्महत्या होणार नाही'ची घोषणा फेल

तसेच, गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही.

भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. अशा शब्दात इशारादेखील बावनकुळेंनी ठाकरेंना दिला.

Chandrashekhar Bawankule Replied To Uddhav Thackeray On Dynasty Alligation
Uddhav Thackeray : शिवसैनिकांना 'संजीवनी' देणारे उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाच मुद्दे

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“आज वशंवादावरून माझ्यावर टीका होत आहे. माझ्या घराण्यावर टीका होते आहे. मात्र, मला माझ्या वंशाचा अभिमान आहे. माझ्या घरण्याचा मला अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती फोडणारे हे जनसंघ होते. मात्र, तुमच्या वंशावरूनच वाद आहेत. भाजपाने पक्षात केवळ उपरे भरून ठेवले आहेत की आता तुमचे बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com