
कलाकार होळीचा कार्यक्रम सादर करत असताना तेजप्रताप यांच्या घरातून सामान चोरीला गेल्याचं सांगण्यात येत आहे.
Holi Festival : होळी खेळत असतानाच तेजप्रताप यादव यांच्या घरी 'इतक्या' लाखांची चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल
पाटणा : बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आलीये. वास्तविक, ही घटना होळी दरम्यानची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजप्रताप यादव एकीकडं होळी (Holi Festival) खेळत होते, तर दुसरीकडं त्यांच्या सरकारी निवासस्थानातून 5 लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे.
तेजप्रताप यादव यांचे स्वीय सचिव मिसाल सिन्हा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना दीपकसह 6 कलाकारांवर चोरीची शक्यता वर्तवलीये. ही घटना 9 मार्चची आहे. जेव्हा कलाकारांनी त्यांच्या घरी होळीचा कार्यक्रम सादर केला होता.
10 मार्चला सकाळी कलाकार निघून गेल्यावर सामान चोरीला गेल्याची माहिती मिळाली. यानंतर तेजप्रताप यादव यांचे स्वीय सहाय्यक मिसाल सिन्हा यांनी या चोरीप्रकरणी सचिवालय पोलीस ठाण्यात (Police Station) एफआयआर दाखल केला आहे. तेजप्रताप यांनी होळीच्या निमित्तानं वृंदावन येथील कलाकारांना आपल्या निवासस्थानी बोलावलं होतं. कलाकार होळीचा कार्यक्रम सादर करत असताना तेजप्रताप यांच्या घरातून सामान चोरीला गेल्याचं सांगण्यात येत आहे.