Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Home Ministry Decision about Tej Pratap Yadav : तेजप्रताप यादव बिहारमधील महुआ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Tej Pratap Yadav, son of Lalu Prasad Yadav, receives Y-Plus security cover following the Central Home Ministry’s decision for enhanced protection.

Tej Pratap Yadav, son of Lalu Prasad Yadav, receives Y-Plus security cover following the Central Home Ministry’s decision for enhanced protection.

esakal
Updated on

Tej Pratap Yadav gets Y-Plus security cover : बिहार निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र तत्पुर्वी राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेजप्रताप यादव यांच्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तेजप्रताप यादव बिहारमधील महुआ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

तेजप्रताप यादव यांना आता Y-प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, CRPF सुरक्षा पथक त्यांना प्रत्यक्षात सुरक्षा प्रदान करेल. VIP सुरक्षा यादी अंतर्गत तेज प्रताप यादव यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सुरक्षा एजन्सींनी अलीकडेच त्यांच्या सुरक्षेबाबत एक विशेष अहवाल सादर केल्याचे वृत्त आहे, त्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला.

या प्रकारच्या सुरक्षेमध्ये ११ सशस्त्र पोलिस कमांडो तैनात असतात, ज्यामध्ये पाच पोलिस कर्मचारी व्हीआयपींच्या घराभोवती आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. शिवाय, सहा पीएसओ देखील तीन शिफ्टमध्ये सुरक्षा प्रदान करतात.

Tej Pratap Yadav, son of Lalu Prasad Yadav, receives Y-Plus security cover following the Central Home Ministry’s decision for enhanced protection.
Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलेले आहे. १८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा जागांवर जवळवपास ६५ टक्के मतदान झाले आहे. जे आतापर्यंतचे सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १,३१४ उमेदवारांनी निवडणूक लढवली, ज्यात १,१९२ पुरुष आणि १२२ महिलांचा समावेश आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com