"राफेल' इतकेच "तेजस'ही सक्षम : मनोहर पर्रीकर

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पणजी : स्वदेशी बनावटीचे "तेजस' हे लढाऊ विमान हे राफेल विमानाइतकेच सक्षम आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सांगितले. "तेजस' विमान गेल्याच वर्षी हवाई दलात दाखल झाले असून, राफेल विमानांच्या खरेदीचाही फ्रान्स सरकारबरोबर नुकताच करार झाला आहे.

पर्रीकर म्हणाले, ""तेजस हे संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान जगातील कोणत्याही लढाऊ विमानांइतकेच चांगले आहे. राफेलसारखीच या विमानाची क्षमता आहे. फक्त ते हलके असल्याने त्यातून 3.5 टन वजनाची क्षेपणास्त्रे वाहून नेता येतात, तर राफेलची हीच क्षमता नऊ टनांची आहे. तसेच, इंजिनाच्या संख्येत फरक असल्याने राफेलचा वेग "तेजस'च्या दुप्पट आहे. तब्बल 33 वर्षे प्रलंबित असलेला "तेजस'चा प्रकल्प या सरकारने उचललेल्या पावलामुळे एका वर्षात पूर्ण झाला.''

Web Title: tejas equal to rafel