हिंम्मत असेल तर भाजपने बिहारमध्ये एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी : तेजस्वी यादव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bihar politics

भारतात एकच पक्ष टिकेल या भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला आहे.

हिंम्मत असेल तर भाजपने बिहारमध्ये एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी : तेजस्वी यादव

सध्या देशातील राजकीय वातावरणही गढूळ झालेलं चित्र आहे. आज अनेक ठिकाणी कॉंग्रेसने आंदोलन पुकारलं आहे. महागाई आणि बेरोजगारी विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. दरम्यान, दुसरीकडे बिहारमध्ये विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भारतात एकच पक्ष टिकेल या वक्तव्याचा यादव यांनी समाचार घेतला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी नड्डा आणि भाजपला आव्हान केलं आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये भाजपने एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी, आता त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यादव यांच्या या आव्हानावर बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी टीकेची झोड उठवली आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, तेजस्वी यावद अर्थहीन बोलत आहेत. आधी त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या 40 जागांवर एकट्याने लढून दाखवावे आणि नंतर भाजपला आव्हान करावे.

हेही वाचा: CM शिंदे एक-दोन तासच झोपतात; केसरकरांनी सांगितलं आजाराचं कारण

तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, भाजपला बिहारमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. भाजपने एकट्याने निवडणूक लढवल्यास त्यांचा अहंकार मोडेल, असा दावा त्यांनी केला. जनताच भाजपला योग्य जागा दाखवेल असंही त्यांनी खडसावलं आहे. ते म्हणाले, जनतेचा संघ आणि भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून विरोध संपवण्यासाठीचे त्यांचे राजकारण दिसून येते. पण, लोकशाहीची जननी असलेल्या बिहारमध्ये भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत. बिहारच्या जनतेला भाजपला धडा शिकवायचा आहे.

यादव म्हणाले, बिहारच्या मातीतली लोकशाही संपवण्याची भाषा भाजपचे नेते करत आहेत. बिहारची जनता हे मान्य करणार नाही. केवळ सत्ताधारी पक्षातूनच लोकशाही चालत नाही, तर विरोधकांची भूमिका यामध्ये महत्त्वाची असते. केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही यादव यांनी यावेळी केला आहे. सत्तेविरोधी बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर भाजप करत आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: काँग्रेसचं मुंबईत आंदोलन; संजय निरुपमांसह प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात

Web Title: Tejashwi Yadav Criticized To J P Nadda Statement Bihar Election Run Independently By Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..