Congress Protest | काँग्रेसचं मुंबईत आंदोलन; संजय निरुपमांसह प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Protest Mumbai
काँग्रेसचं मुंबईत आंदोलन; नाना पटोलेंसह नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न

काँग्रेसचं मुंबईत आंदोलन; संजय निरुपमांसह प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात

देशभरात सध्या काँग्रेसचं जोरदार आंदोलन सुरू आहे. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात ही निदर्शनं होतायत. दरम्यान, मुंबईतही काँग्रेसची निदर्शनं सुरू आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतलं हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू केली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम तसंच माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, अस्लम शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा: ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक; PM मोदींच्या घरावर मोर्चा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी होत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा राज्यात १६ दिवसांचा दौरा होतोय. सात लोकसभा मतदारसंघ व १५ विधानसभा मतदारसंघातून ते पदयात्रा काढणार असून त्या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत.

Web Title: Congress Leaders Protest In Mumbai Raj Bhavan Area Nana Patole Balasaheb Thorat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..