तेजस्वी यादव महाआघाडीचे CM पदाचे उमेदवार, आता NDAने सांगावं, नाहीतर महाराष्ट्रासारखं कराल; भाजपवर टीका

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलंय. तर मुकेश साहनी उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं सांगण्यात आलंय. यानंतर एनडीएला त्यांचा नेता कोण असा प्रश्नही विचारला आहे.
Congress attacks BJP after Tejashwi Yadav named CM face warns of Maharashtra like crisis

Congress attacks BJP after Tejashwi Yadav named CM face warns of Maharashtra like crisis

Esakal

Updated on

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा केलीय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांनी पाटना इथं झालेल्या पत्रकार परिषदेत हे जाहीर केलं. ते म्हणाले की, आम्ही लोकप्रिय आणि तरुण तडफदार नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करत आहोत. याशिवाय मागास वर्गातून असलेले मुकेश साहनी हे उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असंही सांगण्यात आलं. सरकार स्थापन झाल्यास आणखी काही मागास वर्गातील नेते उपमुख्यमंत्री बनतील असं अशोक गहलोत म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com