तेजप्रताप यादव यांना संताप अनावर

‘राबडी आवास’मधून तावातावाने बाहेर; पक्षांतर्गत वाद शिगेला
india
india sakal

पाटणा : बिहारमध्ये प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत वाद पेटला आहे. माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव यांना आज संताप अनावर झाला. भावाशी बोलू न दिल्याने ते भडकले आणि तावातावात घराबाहेर निघून गेले. संजय यादव यांनी आपल्याला बोलताना रोखल्याचा आरोप त्यांनीकेला. जनता दरबार भरवण्याचीही घोषणा तेजप्रताप यांनी केली आहे. (Politics News)

राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंदसिंह यांनी काल तेजप्रताप यांचे निकटवर्तीय विद्यार्थी विभागाच्या कार्यकारी पदावरून आकाश यादव यांना हटविले. त्याठिकाणी गगन कुमार यांची नियुक्ती केली. अर्थात जगदानंद यांनी हे पद रिक्त असल्याने त्यांची नियुक्ती केल्याचा दावा केला आहे. मात्र त्यांनी आकाशच्या विषयावर मौन बाळगले. परंतु या कार्यवाहीने तेजप्रताप यादव भडकले आहेत. आकाश यादव यांना हटविल्यानंतर राजदतील अंतर्गत कलह शिगेला पोचला आहे. नाराज तेजप्रताप यादव यांनी आकाश यांना न कळवता हटवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यानंतर पक्षांत वाद वाढला आहे. यादरम्यान आज ‘राबडी आवास’ येथे तेजप्रताप यादव हे तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी गेले. परंतु थोड्या वेळातच ते रागारागात बाहेर आले. संजय यादव यांनी आपल्याला रोखले. त्यांनी भावाशी बोलू दिले नाही, असा आरोप केला.

india
माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती; PM मोदींनी केलं ट्विट

तेजप्रताप अर्ध्या तासातच घराबाहेर आल्याचे माध्यमांनी सांगितले. आपण तेजस्वी यांच्याशी बोलत असतानाच संजय यादव यांनी आडकाठी केली. भावाशी बोलताना अडथळे आणणारे ते कोण. जे काही बोललो, ते माध्यमांसमोर मांडू, असेही तेजप्रताप म्हणाले. उद्यापासूनच आपण जनता दरबार भरविणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पाटण्यात पक्षांतर्गत वाद सुरू असताना लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी दिल्लीत असून ते कन्या खासदार मिसा भारती यांच्या निवासस्थानी राहत आहेत.

लालू पुत्रांमधील संघर्ष तीव्र

पक्ष कार्यालयात तेजप्रताप व तेजस्वी यांनी उभारलेल्या फलकांवर एकमेकांची छायाचित्रे नसल्याने वाद निर्माण झाला होता. जगदानंदसिंह हे हिटलर असल्याचे तेजप्रताप यांनी म्हटले होते. त्यावरून त्यांचे संबंधही तणावपूर्ण बनले. तेजप्रताप यांच्या बडबडीने नाराज प्रदेशाध्‍यक्षांनी गेल्या आठवड्यापासून पक्ष कार्यालयात जाण्‍याचे टाळले होते. आकाश यादव यांना हटविल्यानंतर तेजप्रताप यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाऊ तेजस्वी यांचे नाव न घेता ‘काही लोकांच्या सांगण्यावरून ही कारवाई केली आहे,’ असा आरोप त्यांनी केला. असे करणे पक्षाच्या घटनेविरोधात आहे. दिल्लीत जास्त काळ राहणाऱ्या लोकांच्या सल्ल्याने हे केले असल्‍याचे तेजप्रताप यादव म्हणाले. दोन्ही भावातील बेबनाव पाहता आगामी काळात यादव घराण्यात राजकीय व कौटुंबिक फूट पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

india
PM मोदींनी केलं शास्त्रज्ञांचं कौतुक; झायडस कॅडीलाच्या लशीला मंजूरी

‘आरजेडी’चे प्रदेश अध्यक्षांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून आकाश यादव यांच्या जागी गगन कुमार यांची पक्षाच्या विद्यार्थी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

- तेजस्वी यादव, नेते, ‘आरजेडी’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com