esakal | पोलिसाने जमवली तब्बल 70 कोटींची मालमत्ता; ACB कडून कारवाई सुरु 
sakal

बोलून बातमी शोधा

ACP Reddi

तब्बल 70 करोडची अवैध संपत्ती या पोलिस अधिक्षकाने जमा केल्याची माहिती समोर आली आहे. रेड्डी हे मलकाजगिरी विभागात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून रुजू आहेत.   

पोलिसाने जमवली तब्बल 70 कोटींची मालमत्ता; ACB कडून कारवाई सुरु 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैद्राबाद : तेलंगणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिक्षकांवर एसीबी (ANTI-CORRUPTION BUREAU) म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला आहे. एसीबीने सहाय्यक पोलिस आयुक्त येल्माकुरी नरसिम्हा रेड्डी यांच्याविरोधात प्रमाणाबाहेर अधिक संपत्ती जमा केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी छापे टाकले आहेत.  या छाप्यांमधून ही गोष्ट समोर आली आहे की, त्यांनी वैध मार्गांनी होणाऱ्या संपत्तीहून अधिक संपत्ती ही बेकायदेशीररित्या आणि संदिग्ध पद्धतीने जमा केली आहे. यापद्धतीने तब्बल 70 करोडची अवैध संपत्ती या पोलिस अधिक्षकाने जमा केल्याची माहिती समोर आली आहे. रेड्डी हे मलकाजगिरी विभागात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून रुजू आहेत.   

हेही वाचा - गरीबों का शोषण, ‘मित्रों’ का पोषण, यही है मोदी जी का शासन - राहुल गांधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून जाहिर केलं आहे की, या अवैध संपत्तीची सरकारी किंमत 7.5 कोटी रुपये असली तरी स्थानिक बाजारात त्याची किंमत 70 कोटीपर्यंत जाते.

ही सर्व कारवाई एका गुपित माहितीच्या आधारे केली गेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेलंगाणा राज्यात हैद्राबाद, वारंगल, जनगांव, नालगोंडा, करीमनगर जिल्हा आणि आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यात जवळपास 25 ठिकाणी छापे मारले आहेत. 

हेही वाचा - राफेल कराराची 'क्रोनोलॉजी' आता समजली; CAG अहवालावरुन काँग्रेसचा निशाणा

या तपासात अनंतपुर मधील 55 एकरची शेतीयोग्य जमीन, मधेपूरमध्ये सायबर टॉवर्सच्या समोर एक मोठी जमीनीचा प्लॉट, हफिजपेटमध्ये आणखी दोन जमीनीचे प्लॉट, एक कमर्शियल G+3 बिल्डींग, दोन घर, 15 लाख बँक बँलेंस, दोन बँक लॉकर, रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक  आणि इतर काही व्यवसायांची माहिती मिळाली आहे. विभागाने सांगितलं आहे की, या  प्रकरणी अजून तपास सुरु आहे.