Telangana : भाजपकडून टीआरएसच्या 4 आमदारांना 100 कोटींची ऑफर; तिघांना 15 कोटींसह पोलिसांनी घेतलं ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Telangana Rashtra Samithi TRS

पक्ष बदलण्यासाठी आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आमदारांनी केलाय.

Telangana : भाजपकडून टीआरएसच्या 4 आमदारांना 100 कोटींची ऑफर; तिघांना 15 कोटींसह पोलिसांनी घेतलं ताब्यात

तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीच्या (Telangana Rashtra Samithi TRS) आमदारांना ऑफर देऊन खरेदीचा प्रयत्न केल्याचं प्रकरण समोर आलंय. याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दुसरीकडं पक्ष बदलण्यासाठी आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केसीआर (KCR) यांच्या पक्षाच्या आमदारांनी केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबराबाद पोलिसांनी (Cyberabad Police) या प्रकरणी अजीज नगर येथील फार्महाऊसची झडती घेत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र म्हणाले, तेलंगणा राष्ट्र समितीच्या चार आमदारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. या आमदारांना 100 कोटी ते 50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, बुधवारी संध्याकाळी अजीज नगरमधील फार्महाऊसची झडती घेण्यात आली. आमदारांनी पोलिसांना फोन करुन सांगितलं की, "त्यांना पक्ष बदलण्यासाठी आमिष आणि लाच दिली जात आहे."

हेही वाचा: नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीवर भाजपचा पलटवार, म्हटलं...

15 कोटी जप्त

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटक करण्यात आलेल्या 3 आमदारांसह 15 कोटी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. भाजपवर आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोप करण्यात आला आहे. टीआरएसनं भाजप त्यांच्या चार आमदारांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय. या चार आमदारांची नावंही समोर आली आहेत. यामध्ये गा कांथा राव, गुववाला बलाराजू, बीरम हर्षवर्धन रेड्डी आणि पायलट रोहित रेड्डी यांचा समावेश आहे. या चार आमदारांनीच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली होती.

हेही वाचा: VIDEO : छठ घाटांच्या पाहणीदरम्यान नितीशकुमार जखमी; पायाला-पोटाला गंभीर दुखापत, स्वत: सांगितला सगळा प्रकार

टॅग्स :BjpTelangana